
कणकवली : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतºयाच्या सभोवती पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत रविवार २२ जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. या किल्ल्यावरील शिवरायांचा पहिला पुतळ्या पडल्यानंतर १०० कोटी रुपये खर्च करून त्याठिकाणी नव्याने शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या आजुबाजूचा परिसरात पडझड सुरू झाली आहे. पडझडीच्या घटनांमुळे आजूबाजूचा परिसर कोसळयाच्या भीतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटकांनी बंदी घतली आहे का, असा प्रश्न शिवप्रेमींना पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळ्याच्या परिसराचे निकृष्ट काम करणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
राजकोट येथे शासनाने १०० कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारला आहे. मुख्यमंत्री व सरकारमधील मंत्री राजकोट येथे उभारलेल्या शिवरायांचा पुतळा १०० वर्षे टिकेल, असे सांगत आहे. मात्र, पुतळ्याच्या परिसरात पडझडीच्या घटना घडू लागला आहेत. त्यामुळे शिवरायांचा पुतळा १०० वर्षे टिकेल का असा प्रश्न शिवप्रेमींना पडला आहे. सार्वजनिक विभागाने केलेल्या कामावर स्वत:च्या विभागाचा विश्वास नसल्याने त्यांनी राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. समुद्रापासून राजकोट किल्ला व शिवरायांचा पुतळा दूर आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा किल्ला व शिवरायांच्या पुतळ्या धोका नाही. मात्र, शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसरातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा परिसर खचतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले टिकत आहेत. मात्र, राजकोट येथील किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री व सरकारमधील मंत्री राजकोट किल्ल्यावरील पुतळा १०० टिकेल, असे सांगत आहेत. मात्र, परिसरात पडझडीच्या घटना घडत असल्याने पुतळा कोसळण्याचा भीती आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले काम निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्न लक्ष घालून निकृष्ट काम करणाºया दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.