कॉंग्रेसकडून दिवंगत श्रीधर नाईकांना अभिवादन...!

Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 22, 2025 13:43 PM
views 173  views

कणकवली : काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेसचे दिवंगत नेते आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीधर नाईक यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, श्रीधर नाईक यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात समाजासाठी जे भरीव कार्य केले ते कधीही विसरता येणार नाही. राजकारण, समाजकारणामध्ये काम करताना धर्मनिरपेक्ष समाजासाठी, गोरगरिब जनतेच्या अडीअडचणीला धाऊन जाण्यासाठी आणि सत्याच्याबाजूने उभे राहण्याचे जे काम केले आहे. आज चौतीस वर्षानंतर सुद्धा विस्मृतीत जात नाही. आपल्या छोट्याशा राजकीय आयुष्यात काँग्रेस पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पक्षवाढीसाठी झोकून देऊन काम केले.