कणकवली बाजारपेठेत खोदलेल्या चरात पुन्हा रुतला टेम्पो

लागोपाठ दोन दिवस वाहने रुतण्याच्या प्रकारावर नगरपंचायतचे दुर्लक्ष | बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांना देखील याचा त्रास
Edited by:
Published on: June 08, 2025 14:08 PM
views 231  views

कणकवली : बाजारपेठेमध्ये शिरसाट कापड दुकान समोर पुन्हा आज रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास टेम्पो खोदलेल्या चरामध्ये रुतल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. काल शनिवारी देखील या ठिकाणी एक टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कणकवली नगरपंचायत कडून या ठिकाणी असलेली पाण्याची पाईपलाईन लिकेज काढण्याकरिता दोन दिवसापूर्वी चर खोदण्यात आला होता.

मात्र, लिकेज मिळाले नसल्याने आज रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास शिरसाट कापड दुकानासमोरील गटारा नजीक भागात असलेली पाईपलाईन खोदण्यात आली व पाईपलाईन खोदल्यानंतर या ठिकाणी रस्त्यापेक्षा उंचीची माती टाकून भराव करण्यात आला होता. मात्र आज देखील दुपारी या ठिकाणी टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडीसह या भागातील दुकानदारांना देखील याचा त्रास सहन करावा लागला. नियमित गाड्या रुतण्याच्या या प्रकाराबाबत कणकवली नगरपंचायत ने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी येथील व्यापारी व जनतेतून केली जात आहे.