कणकवलीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश

देवगडातील चोराच्‍या मुसक्‍या आवळल्‍या ; चोरट्यासह दुचाकी ताब्यात सिंधुदुर्ग एलसीबीची मोठी कारवाई
Edited by:
Published on: June 01, 2025 19:43 PM
views 96  views

कणकवली : कोणताही पुरावा हाती नसताना एलसीबीने आरोपीपर्यंत पोहचत दुचाकी चोरीचा पर्दाफाश केला आहे. कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरट्यासह चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. देवगड जेटी येथे ही कारवाई करण्यात आली. दुचाकी चोरणारा आरोपी हा नितीन अशोक पाळेकर (वय २८, रा. पाळेकरवाडी, मुटाट) हा असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले.