कणकवली : स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय,भारत सरकार यांच्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४ स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. या वर्षी स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता हे अभियान कणकवली शहरात राबिवण्यात आले. या अभियानाचाच एक भाग म्हणून, आज दिनांक ०२ /१०/२०२४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वच्छ प्रभाग स्पर्धा २०२४ ची घोषणा केली.
आज कणकवली नगरपंचायत व कणकवली कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने kankavali walkathon स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये कणकवली शहरातील विद्यार्थी/विद्यार्थिनी/ नागरिक, कॉलेजचे प्राध्यापक/प्राध्यापिका,कणकवली न.प चे अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधून स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी मा.मुख्याधिकारी यांनी स्वच्छ प्रभाग स्पर्धा २०२४ ची घोषणा केली. सदर स्पर्धेचा कालावधी १ महिन्याचा आहे.
स्पर्धेमध्ये प्रभागात राहणारे नागरिक समुदाय, संस्था, बचत गट, शाळा, महाविद्यालय सहभाग घेऊ शकतात. ह्या स्पर्धेसाठी लागणारे अर्ज व स्पर्धेची पूर्ण माहिती कणकवली नगरपंचायत कार्यालयात मिळेल. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास २५०००/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र द्वितीय क्रमांक १५०००/-सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांकास १००००/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे बक्षीस मिळेल. तसेच प्रभागात स्वच्छतेबाबत उत्कृष्ट नावीन्यपूर्ण कल्पना रबिवणाऱ्यास ५०००/- रुपयाचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन कणकवलीच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचलावे याचे आवाहन मा.मुख्याधिकारी यांनी केले.