
कणकवली : ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून माध्यमिक विद्यालय नाटळ येथे सह शालेय वेशभूषा स्पर्धा व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी क्रांतिकारकांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय करून दिला. क्रांतीची वाटचाल व आपलं जीवन तसेच स्वातंत्र्यसंग्रामातील उठाव याविषयी माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली .या स्पर्धेमध्ये प्रशालेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी वैष्णवी मिलिंद डोंगरे हिने अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारत प्रथम क्रमांक मिळवला.तर ईशा दयानंद घाडीगावकर हिने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत द्वितीय क्रमांक मिळवला.श्रावणी पांडुरंग सावंत व सिद्धी सुनिल झोरे या विद्यार्थिनींनी कोळीण व सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत तृतीय क्रमांक मिळवला.याच ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्य साधून प्रशालेमध्ये भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
या भाषण स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट व इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट अशा गटामध्ये ही स्पर्धा पार पडली. माझा आवडता क्रांतिकारक, क्रांतिकारकांचा जीवन परिचय,क्रांतीचे मूल्य - देश स्वातंत्र्य या विषयावर लहान गटातील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तर क्रांतिकारकाचे कार्य,भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीची गरज,भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेले उठाव या विषयावर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी भाषणे केली .या भाषण स्पर्धेला एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत लहान गटातील, सर्वेश सर्वोत्तम परब प्रथम व सोहम विनायक गावडे याने द्वितीय तर लक्ष संदीप पेंडुरकर याने तृतीय क्रमांक मिळवला.तर मोठ्या गटामध्ये कु. साक्षी दयानंद गावकर हिने प्रथम क्रमांक मिळवला.रिया विलास गावकर, व धनश्री प्रकाश गावकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी सर्व विद्यार्थी व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ. प्रणिता तेली यांनी अभिनंदन केले तर राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ संस्था अध्यक्ष श्री.भालचंद्र सावंत तसेच शालेय समिती सेक्रेटरी श्री.निलेश सावंत,शालेय समिती चेअरमन श्री. नितीन सावंत यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत उपक्रमाचे कौतुक केले आहे.