
कणकवली : कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीच्या कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय, कणकवलीचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष जून २०२४ परीक्षेचा निकाल १००% लागला असून दिव्या दिलीप धामापूरकर ८६.४५% प्रथम, पौर्णिमा सुरेश भागवडे ८४.९०% द्वितीय तर तृतीय राज दशरथ पवार ८४.६५%, चतुर्थ नूतन सुभाष माने ८२.५५% तर पंचम श्रद्धा चंद्रकांत देसाई ८१.८५% यांनी प्राप्त केला.
सर्व गुणवंत व यशस्वी छात्राध्यापक छात्राध्यापिकांचे कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीचे डॉ. एस्. एन्. तायशेटे (चेअरमन) डी.एम्. नलावडे (सचिव) एम्.ए. काणेकर (उपचेअरमन) तसेच अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य - एस्. व्ही. सोनुर्लेकर, पी.ए. यादव (विज्ञान विभाग प्रमख) पी. ए. वळवी (सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख ) एस्. डी. गायकवाड (हिन्दी विभाग प्रमुख) व निलेश पारकर (क. लिपीक) यांनी अभिनंदन केले असून, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.