
कणकवली : शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवलीच्यावतीने २ ऑगस्ट रोजी श्री संत शिरोमणि नामदेव महाराज समाधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त श्री संत शिरोमणि नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष सुहास वरुणकर यांच्या कणकवली, शिवाजीनगर येथील निवासस्थानी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. तसेच या सोहळ्या निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष अजित काकडे, खजिनदार किशोर शंकरदास, सहकार्यवाह ऋषिकेश कोरडे,कार्यवाह अभिजित मिरजकर, महिला मंडळ अध्यक्षा विनिता वरुणकर, उपाध्यक्षा माधवी काकडे,कार्यवाह पूजा शंकरदास,खजिनदार रश्मी महाडीक व
कार्यकारी मंडळ सदस्य, महिला मंडळ व सल्लागार समिती आदी उपस्थित राहणार आहेत. यादिवशी सकाळी १० वाजता श्री संत शिरोमणि नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी ११वाजता स्वरसाधना ग्रुप, केरवडे यांचा शास्त्रीय व उपशास्त्रीय, भावगीत व भक्तीगीतांचा सुमधुर कार्यक्रम,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायं ४.३० वाजता ज्ञाती बंधु-भगिनींचा विविध गुणदर्शन कार्यक्रम, सायं ६ वाजता ज्ञाती भगिनींकरीता फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सायं ७ वाजता गुणगौरव व सत्कार समारंभ समारोप, रात्री ८.१५ वाजता ज्ञाती बांधवांकरीता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यावेळी नामदेव शिंपी समाजातील बंधू भगिनींनी व मित्रमंडळींनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुहास वरुणकर यांनी केले आहे.