कणकवलीत चोरट्यांचा सुळसुळाट !

कलमठ गुरववाडीत धाडसी चोरी
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 24, 2024 04:44 AM
views 2294  views

 कणकवली : कणकवली तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. कणकवली कलमठ येथील गुरववाडी मधील रुपेश जाधव यांच्या घरात धाडसी चोरी झाली आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

  यामध्ये चोरट्याने घरामध्ये घुसून आत मध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या  बेडरूमला बाहेरून कडी घातली व बाहेरील सामान असता व्यस्त करत महत्त्वाचे मिळते काय पाहिले त्यामध्ये  त्याने काही साहित्य आणि नवीन दुचाकी चोरट्याने घेऊन पलायन केले आहे. त्यामुळे घरात माणसं असताना घुसून धाडसी चोरी या चोरट्याने केल्यामुळे या चोरट्यांना कोणाचेच अभय राहिले नाही असे दिसत आहे.

 सोमवारी रात्री देखील कणकवली शहरांमध्ये एका ठिकाणी चोरी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच ही चोरी झाल्याने कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.