कांदळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी राजू कदम बिनविरोध

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 15, 2024 08:08 AM
views 414  views

मालवण : कांदळगाव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजू कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच रणजित परब, सदस्य यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी राजू कदम यांचे अभिनंदन केले. ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामविकास अधिकारी सागर देसाई सरपंच रणजित परब, मधुरा परब, अनघा कदम, विकास आचरेकर, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, शाखा प्रमुख दीपक परुळेकर, मसुरे ग्रा.प सदस्य पपू मुळीक, युवासेना पदाधिकारी सागर कदम, गाव प्रमुख नितीन परब, यासह अनंत परब, महेश परब, महेश आयकर, राकेश लाड, अमित सातार्डेकर, संदीप परब, ओंकार पाटकर, शैलेश पाटकर, दिव्येश परब, अजय परब, आनंद लाड, प्रशांत कांदळगावकर, तात्या परब, गणेश मालप, प्राजक्ता परब, अर्चना पाटकर, ग्रा. प कर्मचारी आशिष आचरेकर, गजानन सुर्वे, सुरेखा कदम, धारगळकर, रमण कदम, आदी उपस्थित होते.