देवगड - वाडा येथील कंचना कमलाकर नेने कालवश...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 14, 2023 14:28 PM
views 366  views

देवगड : देवगड तालुक्यातल्या वाडा येथील कंचना कमलाकर नेने यांचे काल १३ नोव्हेंबरला निधन झाले. वाडा येथील सुप्रसिद्ध किराणा माल व्यावसायिक कमलाकर नेने यांच्या त्या पत्नी तर स्थापत्य अभियंता राजू नेने यांच्या त्या मातोश्री होत.

कंचना कमलाकर नेने या गांवातील एक मृदूभाषी, सकारात्मक विचारसरणी जोपासत सामाजिक, व्यावसायिक व कौटुंबिक सक्षमता जपत सदैव कार्यरत व्यक्ती म्हणून त्या सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. कंचना कमलाकर नेने यांच्या निधनाने जिल्ह्यातील विविध स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.