कणकवलीत होणार महाआरती !

नितेश राणेंच्या हस्ते कार सेवकांचा सत्कार
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 20, 2024 06:22 AM
views 305  views

कणकवली : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडत आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे.

त्यानुसार कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचे आमदार  नितेश राणे  यांच्या हस्ते कणकवली मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ७.०० वाजता महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर १९९२ साली कार सेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर रात्रौ ९ वाजता प्रभू श्रीरामाच्या रामलीलांचे दशावतारी नाट्य सादर करण्यात येणार आहे.