संगीत आरती स्पर्धेत दत्त प्रासादीक आरती मंडळ सोलगाव, राजापूर प्रथम

कणकवलीत कनकब्रम्ह मित्रमंडळाचं आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 10, 2024 12:21 PM
views 204  views

कणकवली : येथील कनकब्रम्ह मित्रमंडळातर्फे आयोजित संगीत आरती सादरीकरण स्पर्धेत सोलगाव राजापूर येथील दत्त प्रासादीक आरती मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. रविवार ७ जानेवारी या दिवशी वागदे येथील श्री आर्यादुर्गा मंदिरात ही स्पर्धा घेण्यात आली. पारंपरिक आरत्यांचे संवर्धन, प्रचार, प्रसार करून त्यांचे जतन व्हावे आणि पुढील पिढीला त्याची आवड निर्माण व्हावी या हेतुने कनकब्रम्ह मित्रमंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. 

द्वितीय क्रमांक ओंकारेश्वर भजन मंडळ लांजा जावडे संघाला तर तृतीय क्रमांक दत्तप्रासादीक आरती मंडळ कवठी कुडाळ या संघाला मिळाला. विजेत्या संघांना अनुक्रमे रू.५हजार, ३ हजार व रू.२ हजार  व सन्मानचिन्ह देण्यात आले.  तसेच उत्तेजनार्थ  पंचम सवारी देवगड,  सोमेश्वर प्रासादीक भजन मंडळ चांदोर व हनुमान सेवा मंडळ, काटवली या संघांना प्रत्येकी रू.१ हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले. 

 या  स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ संघांनी भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण माधव गावकर, प्रसाद शेवडे, नरहर करंबेळकर यांनी केले. मंदार मराठे, अतुल करंबेळकर, कांचन काजरेकर, उत्तम बाक्रे, विघ्नेश गोखले, संतोष कामतेकर, सोनु कामतेकर, श्वेता मुळये, मानसी आपटे, शानु मराठे यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी परीश्रम घेतले.