
रत्नागिरी : मराठा मंदिर ग्लोबल स्कूल आणि युथ फेस्टीवल आर्टिस्ट असोसिएशन आयोजित शिवकिल्ला स्पर्धा मराठा मंदिर ग्लोबल स्कूल येथे झाली. पारितोषिक वितरण दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. हे स्पर्धेचे पहिलेच वर्ष असले तरीही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत एकूण 29 संघ सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शिवगीतांचा कार्यक्रम झाला. सर्व नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनचे मुख्य समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी आभार मानले.
प्रहर महाकाळ व प्रसिध्द मूर्तिकार स्वप्नील कदम यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धा प्रमूख ओंकार बंडबे आणि स्पर्धा आयोजक सचिन लांजेकर आणि ऍड सुरज बने आहेत. या स्पर्धेसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी आणि संतोष नलावडे ट्रस्टी मराठा मंदीर मुंबई, प्रतापराव सावंत-देसाई , भाऊ देसाई, मराठा मंडळ उपाध्यक्ष केशवराव इंदुलकर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. व्यवस्थापन करण्यासाठी मुख्याध्यापक कविता विश्वकर्मा आणि मराठा मंदिर ग्लोबल स्कूल सचिव ममता ताई नलावडे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
शिवकिल्ला स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक (प्रायोजक - श्री संवाद अभ्यास केंद्र टर्निंग पॉईंट सायन्स अकादमी - डॉ. आनंद आंबेकर आणि प्रा.संदीप गवळी , गडहिंग्लज कोल्हापूर)
कमलाबाई विसगुते हायस्कूल , कुवारबाव
व्दितीय क्रमांक (प्रायोजक - श्री कॉम्प्युटर सेल्स ऍड सर्व्हिस - प्रा. योगेश जाधव)
रा भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी
तृतीय क्रमांक (प्रायोजक - श्री कॉम्प्युटर सेल्स ऍड सर्व्हिस - प्रा. योगेश जाधव)
फाटक हायस्कूल , रत्नागिरी
उत्तेजनार्थ
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , रत्नागिरी
पटवर्धन हायस्कूल , रत्नागिरी
पोदार इंटरनॅशनल स्कूल , रत्नागिरी
सीटी कॉन्व्हेन्ट , रत्नागिरी
देसाई हायस्कूल , रत्नागिरी
माने इंटरनॅशनल स्कूल , रत्नागिरी
(प्रायोजक - श्री तेजस साळवी)
विशेष पारितोषिक
अविष्कार शाळा रत्नागिरी
इतर प्रायोजक - महाकाली डेकोरेट श्री मिलिंद गुरव
साउंड सिस्टीम -संदीप कर्लेकर, हॉटेल अंगद पंगत श्री राजेश आंबेकर आणि साक्षी आंबेकर , कीर्ती सेल्स श्री ऍड. बंटी वणजु, श्री सचिन लांजेकर , श्री तन्मय सावंत , फोटोग्राफी श्री परेश राजिवले ,श्री राजेश जाधव, सपना साप्ते चवंडे, ओवी बंडबे, रश्मी मांडवकर उपस्थित होते.