कळसुलकरच्या जयराम राऊळने साकारली तुळशी पत्रावर विठू माऊली

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 11:19 AM
views 86  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी प्रशालेमध्ये शिक्षण घेत असणारा कुमार जयराम जयेश राऊळ (इयत्ता-दहावी) याने देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने तुळशी पत्रावर विठू माऊलीचे चित्र साकारून आपल्या हातात असलेल्या कलेचा प्रत्यय आणून दिला आहे.

           प्रशालेतील चित्रकला शिक्षक श्री एस.व्ही.पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशालेतील विद्यार्थ्यांना कलेविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी सतत प्रेरणा देत आले आहेत, त्याचेच हे एक उत्तम उदाहरण.

         प्रशालेतर्फे व संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पै, सचिव प्रसाद नार्वेकर,संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक एन पी मानकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.