कळसुलकरच्या विद्यार्थ्यांनी जिंकली मनं !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2024 09:41 AM
views 165  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय .बी .सय्यद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. त्यामध्ये भारतातील सण,  उत्सव , परंपरा वेशभूषा, धर्म तसेच नृत्य गीतगायन प्रकार सादर करताना  कोकणातील आवडता दशावतारी दणदणीत नाट्य प्रयोग सादर करून भारतीय संस्कृती व परंपरा जपण्याचा वसा विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. चिन्मयी सोमस्कर व समृद्धी सडेकर यांनी केले. मार्गदर्शक म्हणून सौ. सोनाली परब आणि सौ. आलेखा नाईक यांनी पाहिले.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक नारायण मानकर, प्रभारी मुख्याध्यापक सुर्यकांत भुरे, कॉलेज प्रमुख प्रा. उत्तम पाटील तसेच सहाय्यक शिक्षिका गीता सावंत, प्राथमिक विभागाचे श्री .धोंडी वरक तसेच उच्च माध्यमिक सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते . आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद कोलगावकर यांनी आपल्या गायनाने केले.