नेरुरच्या कलेश्वर मंदिरात असा साजरा होणार महाशिवरात्र उत्सव !

Edited by: भरत केसरकर
Published on: February 27, 2024 04:59 AM
views 334  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिरात ४ ते ८ मार्च रोजी दरवर्षी प्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 

सोमवार ४ मार्च २०२४ सकाळी - ८ वा. महारुद्र प्रारंभ, दुपारी - १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी - ३ ते ७ वा. खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा नाट्यप्रयोग ( कू. कामाक्षी नवीन नेरूरकर, मडगाव गोवा यांच्या सौजन्याने ), रात्रौ - ८ वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक ( गायक - दिनू मेस्त्री ),  रात्रौ - १० वा. कीर्तन ह. भ. प. श्री. उपाध्ये बुवा, मंगळवार ५ मार्च २०२४ सकाळी - ८ वा. महारुद्र - श्री. देव गावडोबा, श्री. देव रवळनाथ, श्री. देव भूतनाथ अभिषेक पूजन श्री. देवी सातेरी कडे कुंकु मार्चन व सप्तशती पाठ,  दुपारी - १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ७ वा.आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा नाट्यप्रयोग,  रात्रौ. ८ वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक - दिनू मेस्त्री), रात्रौ. १० वा. कीर्तन - ह. भ. प. उपाध्ये बुवा, बुधवार ६ मार्च २०२४ सकाळी - ८ वा. महारुद्र समाप्ती, दुपारी - १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी - ३ ते ७ वा. ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा नाट्यप्रयोग, रात्रौ. ८ वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक - दिनू मेस्त्री), रात्रौ. १० वा. कीर्तन - ह. भ. प. उपाध्ये बुवा, गुरुवार ७ मार्च २०२४ सकाळी ८ वा. परिवार देवतांवर अभिषेक पूजन, दुपारी १ वा. वरदशंकर पूजा, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ७ वा.  श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा नाट्यप्रयोग ( कै. सुधीर कलिंगण), रात्रौ. ८ वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक ( गायक - दिनू मेस्त्री), रात्रौ. १० वा.कीर्तन - ह. भ. प. उपाध्ये बुवा, शुक्रवार ८ मार्च २०२४ सकाळी - ५ वा. धार्मिक विधी व श्रींचे दर्शन, सकाळी ९ ते १ वा. स्थानिक मंडळांची भजने, सायं - ४ वा. कीर्तन - ह. भ. प. उपाध्ये बुवा, सायं. ६ ते ७ वा. सत्संग भजन - आदित्य साऊळ आणि अंकिता साउळ, रात्रौ. १० वा. पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक ( गायक - दिनू मेस्त्री), रात्रौ. १२ वा. दशावतारी गणपती दर्शन, श्रींचे रथापर्यंत वाजत गाजत आगमन, रात्रौ. १२:३० वा. आकर्षक विद्युत रोषणाईसह श्री. श्रींची रथातून मिरवणूक - दशावतारी नाटकाचा उर्वरित भाग - श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर ( कै. बाबी कलींगण), शनिवार ९ मार्च २०२४ सायं - ५ वा. कीर्तन - ह. भ. प. उपाध्ये बुवा, सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ ते गुरुवार दिनांक ७ मार्च २०२४ पर्यंत रोज दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद. 

तर या उत्सवाला उपस्थित राहावे. असे आवाहन, श्री. देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेरूर यांनी केले आहे.