कलमठ वार्ड क्र. ४ चे उमेदवार सागर लवू वारंग यांना ग्रामस्थांचा प्रतिसाद

Edited by:
Published on: December 16, 2022 19:20 PM
views 212  views

कणकवली :कलमठ वार्ड क्र. ४ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सागर लवू वारंग  यांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण त्यांनी ग्रामपंचायत ही लोकशाहीची पहिली पायरी आहे. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामीण जनतेचे विविध प्रश्न व सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी त्या अंमलात आणण्यासाठी स्थानिक पातळीवरून सुरुवात होते. त्या सोयीसुविधा ग्रामस्थापर्यंत पोहचविण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याची निवड केली जाते. ग्रामपंचायत मध्ये ठेकेदार नको विकासाचे व्हिजन असणारा सदस्य हवा कारण यापूर्वीच्या सदस्यांनी फक्त ठेकेदारी करत स्वताच्या प्रभागातील  ठेके घेतले आणि निकृष्ट दर्जाची कामे केली महाजनी नगर मधील रस्ता हे एक उदाहरण आहे.त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य हा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मधील दुवा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असणारी व्यक्ती ही स्थानिक लोकांच्या अडीअडचणी सोडविणे, शासनाच्या योजना तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत पोहचविणे, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य या पाच मुलभूत गरजा लोकापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य निस्वार्थी व प्रामाणिकपणाने काम करणारा प्रतिनिधी असावा लागतो. त्यासाठी कलमठ ग्रामपंचायत वार्ड क्र. ४ मधून  लवु महादेव वारंग सामाजिक कार्यकर्ते तसेच मराठा समाजाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचे चिरंजीव शसागर लवू वारंग हे वार्ड क्र. ४ मधून उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांना ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा मिळत आहे सागर लवू वारंग हे मराठा आरक्षण संघर्ष समितीचे युवा नेते असून त्यांनी मराठा आरक्षण संघर्ष चळवळीत सक्रीय कार्यकर्ते म्हणून गेली १० वर्षे काम करत आहेत. ते गेली ३० वर्षे कलमठ मध्ये वास्तव्यास असून त्यांना कलमठ मधील रहिवाश्यांच्या समस्या व अडचणीची जाणीव असून अडीअडचणीमध्ये मदत करण्याची आवड आहे. त्यामुळे अशा होतकरू, युवा सदस्यास कलमठ ग्रामपंचायत वार्ड क्र. ४ मधून त्यांच्या बादली या चिन्हावर शिक्का मारून बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीने देखील करण्यात येत आहे.