कै. डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुलीच्यावतीने प्रयोगातून विज्ञान

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 10, 2023 16:44 PM
views 179  views

कणकवली : कै. डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुलीच्यावतीने कणकवलीत शिक्षकांसाठी प्रयोगातून विज्ञान हा साध्या सोप्या आणि उपलब्ध साहित्यातुन प्रयोगांचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आलं होतं. 

प्रयोगातून विज्ञान मुलांना शिकता यावे यासाठी  कै.डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली  च्या वतीने कोकणामध्ये काम सुरू आहे. त्यामुळे आम्ही मुंबईवरून सर्व जण इथे उपस्थित आपल्या भागातील मुले डॉक्टर इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ बनावी यासाठी आमचा हा उपक्रम सुरू असल्याचे डॉ. दामोदर प्रभू यांनी सांगितले.शिक्षकांनी प्रशिक्षणामध्ये जे शिकायला मिळेल  ते  मुलांपर्यंत पोचवावी आणि मुलांकडून  प्रशिक्षण करून घ्यावी हा उद्देश या कार्यशाळेचा असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.


सावंत फाउंडेशन संचलित कै.डॉक्टर रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली यांच्या वतीने  कणकवली विद्यामंदिर हायस्कूल मध्ये माध्यमिक विद्यालय शिक्षकांसाठी प्रयोगातून विज्ञान प्रशिक्षण या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन  आज 10 ऑगस्ट रोजी डॉ रावराणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व डॉ दामोदर प्रभू यांच्या हस्ते  सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ शशिकांत पांडे, डॉ जोहर आत्तारे,  सभासद डॉ .तुळशीराम रावराणे, सचिव शरद सावंत, खजिनदार श्रीकांत सावंत, समीर सावंत , मुख्याध्यापक विजय कांबळे, शिक्षिका वैशाली जाधव,अच्युत वणवे सर, शर्मिला केळुस्कर , त्यांच्यासह बहुसंख्याने विज्ञान शिक्षक उपस्थित होते


डॉ तुळशीराम रावराणे म्हणाले तुम्हाला चांगले शिक्षण आणि विज्ञान शिक्षक बनायचं असेल तर प्रॅक्टिकलवर जास्त भर येण्याची गरज आहे आणि तेच काम सावंत फाउंडेशन करत असल्याने आपण जास्तीत जास्त या प्रशिक्षण वर्गातून शिकून आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे रावराणे यांनी सांगितले.


खजिनदार श्रीकांत सावंत यांनी सांगितले की, कै.डॉ रमेश सावंत यांची इच्छा होती की जिल्ह्यातील  मुले शास्त्रज्ञ व्हावीत यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून हा कार्यक्रम घेण्याचे आयोजन केले. तसेच इतरही आपण कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून घेतले आहेत त्यामध्ये  गरीब मुलांना शिष्यवृत्ती देणे, शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन करणे ,अध्यात्मिक कार्यक्रम, तसेच आंतरराष्ट्रीय शिबिर कळसुलीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये आठ ते दहा देशातले प्रतिनिधी उपस्थित होते. तो एक चांगला कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता भविष्यातही अशाच पद्धतीने सावंत फाउंडेशनच्या वतीने आम्ही काम करत राहू असे सावंत म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शर्मिला केळुस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव शरद सावंत यांनी मानले.