
वैभववाडी : फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) बोर्ड परीक्षेचा कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १००टक्के लागला आहे.महाविद्यालयातील तीनही शाखांमधून २५९ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते,हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.याच विद्यालयाचे प्रफुल्ल मोरे व शुभम परब या दोन विद्यार्थीनी तालुक्यात द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. या कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेतून ५७ विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून १०२ व विज्ञान शाखेतून १०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तीनही शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला शाखेतून कु. यश बाबू शेळके या विद्यार्थ्याने ७७.% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.प्रिती विजय सावंत हिने ने ७६% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.रिया रविंद्र मोरे हिने ७४.०० % गुण प्राप्त करत कला शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखेतून कु.मोरे प्रफुल्ल प्रविण या विद्यार्थ्याने ८५.६७% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.परब शुभम दिलिप याने ८४.५० % गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.करवंजे वैष्णवी अनंत हिने ८३.६७ % गुण प्राप्त करत वाणिज्य शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विज्ञान शाखेतून कु.सुतार हर्ष सुरेश या विद्यार्थीनीने ८२.८३% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.खाडे हर्ष श्रीकांत याने ८२.५० % गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.चाळके अक्षता सहदेव हिने ८१.००% गुण प्राप्त करत विज्ञान शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे प्रशालेचे स्थानिक अध्यक्ष तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर व मुख्याध्यापक बी.एस.नादकर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत, यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.