कणकवलीत रंगणार कबड्डीचा महासंग्राम..!

अभय राणे मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 19, 2024 11:57 AM
views 210  views

कणकवली : अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने 'एआरएम चषक २०२४' या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  कणकवली, टेंबवाडी येथील मैदानावर १९ ते २१ जानेवारी या कालावधीत 'कबड्डीचा महासंग्राम' रंगणार आहे. या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.या उदघाटन सोहळ्याच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

स्पर्धेतील पुरुष गट प्रथम पारितोषिक रोख रुपये २५००४ माजी नगराध्यक्ष  समीर नलावडे पुरस्कृत व  चषक  मोहन राणे यांच्या स्मरणार्थ दिलीप राणे यांजकडून,द्वितीय पारितोषिक रोख रुपये १५००४ राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष  अबिद नाईक पुरस्कृत व  चषक अंजनी राणे यांच्या स्मरणार्थ दिलीप राणे यांजकडून, तृतीय पारितोषिक रोख रुपये ५००४ दिपक बागवे यांच्या स्मरणार्थ निखिल बागवे यांजकडून व  चषक मधुकर जाधव यांजकडून,चतुर्थ पारितोषिक रोख रुपये ५००४ विजय इंगळे पुरस्कृत व चषक अजित काणेकर यांजकडून, अष्टपैलू खेळाडू रोख रुपये १५०० विनोद राठोड यांजकडून व चषक शालिनी राणे स्मरणार्थ संतोष राणे यांजकडून, उत्कृष्ट पकड रोख रुपये १०००  गुणेश राणे स्मरणार्थ परेश परब यांजकडून व चषक सर्वेश बागवे यांजकडून उत्कृष्ट चढाई रोख रुपये १०००

बच्चू प्रभूगांवकर यांजकडून व चषक सुप्रभा सावंत स्मरणार्थ व्यंकटेश सावंत यांजकडून ,शिस्तबध्द संघ रुपये २००० प्रमोद सावंत यांजकडून चषक  महादेव व पार्वती जोगळे स्मरणार्थ जोगळे कुटुंबिय यांजकडून देण्यात येणार आहे. 

महिला गट स्पर्धेसाठी  प्रथम पारितोषिक रोख रुपये ७००४ माजी नगरसेविका  मेघा सावंत पुरस्कृत व चषक अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ राजूशेठ गवाणकर यांजकडून,द्वितीय पारितोषिक रोख रुपये ५००४ धनंजय कसवणकर पुरस्कृत व चषक अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ  राजूशेठ गवाणकर यांजकडून, तृतीय पारितोषिक रुपये ३००४ अक्षय पेंडूरकर यांजकडून व चषक पार्वती जोगले यांच्या स्मरणार्थ  रवी जोगले यांजकडून,चतुर्थ पारितोषिक रुपये ३००४ गणेश तळगांवकर पुरस्कृत व  चषक पार्वती जोगले यांच्या स्मरणार्थ  रवी जोगले यांजकडून, अष्टपैलू खेळाडू रोख रुपये १००४ व चषक चानी जाधव यांजकडून, उत्कृष्ट पकड रोख रुपये ७०४ व चषक  चिंतामणी पेडणेकर यांच्या स्मरणार्थ  अमोल पेडणेकर यांजकडून, उत्कृष्ट चढाई रोख रुपये ७०४ प्रथमेश घाडीगावकर यांजकडून व चषक सुलोचना केतकर यांच्या स्मरणार्थ प्रशांत केतकर यांजकडून, शिस्तबध्द संघ रोख रुपये १००४ प्रथमेश घाडीगावकर यांजकडून व चषक महादेव व पार्वती जोगळे यांच्या स्मरणार्थ जोगळे कुटूंबियाकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धेला क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.