कणकवली मध्ये रंगणार कबड्डीचा महासंग्राम

अभय राणे मित्रमंडळ आयोजित पुरुष व महिला भव्य कबड्डी स्पर्धा 2023 वर्ष तिसरे
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 16, 2022 13:21 PM
views 579  views

कणकवली :कणकवली मध्ये रंगणार कबड्डीचा महासंग्राम अभय राणे मित्र मंडळ आयोजित  पुरुष व महिला भव्य कबड्डी  स्पर्धा दिनांक १२ , १३ व १४   जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धकांची बोली 18 डिसेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिर येथे होणार आहे. तरी कबड्डीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन अभय राणे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.या ARM चषकासाठी जिल्ह्यातील नामवंत खेळाडू व कणकवली शहर मर्यादित महिलांसाठी व पुरुष जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा  असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे यांनी केले आहे संपर्कासाठी  सागर राणे 9175040614, यश पालव  9403070166