ज्योती बुवा - तोरसकर यांचा जिल्हा बँकेतर्फे सत्कार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 28, 2025 18:31 PM
views 221  views

सिंधुदुर्गनगरी  :  ज्योती बुवा तोरसकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले:इतिहास आणि पर्यटन विषयात शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट नुकतीच जाहीर झाली असुन जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते ज्योती तोरसकर यांचा सत्कार करण्यात आला.

 इतिहास अभ्यासक सौ.ज्योती बुवा तोरसकर या शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथून, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले : इतिहास आणि पर्यटन" या विषयात गेली आठ वर्षे संशोधन करीत होत्या. त्यांनी संबंधित विषयाचा सखोल अभ्यास, सर्वेक्षण आणि संशोधन करून विद्यापीठाकडे आपला शोध प्रबंध सादर केला होता. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या संशोधन याला मान्यता देऊन संबंधित विषयात विद्यावाचस्पती प्रदान केली आहे. 

इतिहासाबरोबरच पर्यटन दृष्टिकोनातून केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ल्यांचे हे पहिलेच बहुविद्याशाखीय संशोधन ठरले असून त्यामध्ये पीएचडी मिळविलेल्या अ.शि. देसाई टोपीवाला हायस्कूल,मालवण येथे सहा.शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ ज्योती बुवा तोरसकर यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.