सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम कौतुकास्पद : न्यायमूर्ती भूषण गवई

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 27, 2024 07:38 AM
views 327  views

देवगड : सार्वजनिक बांधकाम विभाग आपले काम कौतुकास्पद करीत आहे. देवगड न्यायालयाच्या इमारतीच्या कोनाशिला कार्यक्रमाला या खात्याने केलेली पूर्वतयारी वाखाणण्याजोगी असल्याचे गौरोद्‌गार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काढले.

देवगड न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन २४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष करून सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करून न्यायमूर्ती गवई यांनी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर दिली. देवगड येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कामाचे कौतुक केले.

नियोजनबद्ध काम

सार्वजनिक बांधकाम विभाग हे अतिशय चांगल्या पद्धतीने व वेळेत कामे पूर्ण करीत आहेत. कार्यकारी अभियंता कणकवलीचे अजयकुमार सर्वगोड हे देखील चांगल्या पद्धतीने कामे करीत आहेत.

त्यामुळे येथील बांधकाम विभागातर्फे करण्यात येणारी कामे ही नियोजनबद्ध व दर्जेदार असल्याचे गौरोद्‌गार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही श्रेय आहे.