
कुडाळ : मुंबईत जाऊन महागड्या खर्चात न्यायाची भीक मागणे हे आपल्याला मान्य आहे की येथील भागातील सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळेत न्याय मिळणे महत्त्वाचे आहे आणि यासाठीच या विभागातील सहा जिल्ह्याचे खंडपीठ कोल्हापूर येथे होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज सायंकाळी कुडाळ येथे प्रथम श्रेणी न्यायालय नवीन इमारतीच्या कोनशिला समारंभप्रसंगी केले
कुडाळ तहसीलदार नजिकच्या जागेत कनिष्ठ स्तर न्यायालयात सन कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर, पारिजात पांडे,खा.विनायक राऊत, जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड मुख्य न्याय दंडाधिकारी दिवाणी न्यायाधीश अश्विनी बाचुळकर, मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड संग्राम देसाई, मुंबई न्यायालयाचे रजिस्टार आर.एन.जोशी,एस.एस.गोसावी, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कार्यकारी अभियंता महेंद्र केणी,आदीसह जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाईक, एड.राजश्री नाईक, उपाध्यक्ष प्रज्ञा पाटील,प्रांताधिकारी विशाल खत्री, ऐश्वर्या काळुसे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड.अविनाश परब, सचिव अँड.महेश शिंपूकडे, ऍड अजित भणगे माजी आमदार राजन तेली रणजित देसाई न्यायमूर्ती रत्नागिरी श्री गोसावी ऍड प्रशांत देसाई ऍड विलास पाटणे ए डी तिरके आदी सह न्यायिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गवई म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन न्यायालयीन इमारतीचं भुमिपुजन आज झाले ही आनंदाची गोष्ट आहे.त्यावेळचे राजकारण आजच्या सारखं नव्हते,असेब्लीमध्ये भांडण करायचे पण नंतर एकत्रित यायचे.प्रत्येकाने आपापल्या कामात चांगले काम केले तर काहीच अडचण येणार नाही. संस्कारमय राजकीय प्राश्र्वभुमी लाभलेला आपला महाराष्ट्र आहे असे सांगत देशाच्या स्वातंतत्र्यानंतर ७५ वर्षात चांगले काम झाले आहे.एकेकाळी आपण बांधकामाच्या नावाने ओरड मारत होतो पण आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करायला हवे कारण आता चांगली बांधकामे होत आहेत.यापुर्वीपेक्षा गेल्या दहा वर्षांत बार कौसिंलचे कार्य चांगले सुरू आहे असे सांगत ऍड.संग्राम देसाई यांच्या कामाचे कौतुक केले.मुंबईत जाऊन महागड्या खर्चात न्यायाची भीक मागणे हे आपल्याला मान्य आहे की येथील भागातील सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळेत न्याय मिळणे महत्त्वाचे आहे आणि यासाठीच या विभागातील सिंधुदूर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी या सहा जिल्ह्याचे खंडपीठ कोल्हापूर येथे होणे आवश्यक आहे असे सागितले
ना.नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात प्रगती करणारा जिल्हा आहे.देश विकसित होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत.आता मोदींचा भारत म्हणून ओळख आहे.अशा भारतात महाराष्ट्र आणि कोकण आहे.पर्यटनातुन जिल्ह्याचा विकास होण्यासाठी प्रयत्न आहेत.देश महासत्ता व्हावा यासाठी सर्वांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक काम करावे असे आवाहन केले.एड.संग्राम देसाई यांचं काम कौतुकास्पद आहे, आमच्याकडुन कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागले तर जरुर हाक मारा आमचं कायमच सहकार्य राहील.आजचा दिवस सिंधुदुर्गच्या इतिहासात आनंदाचा चांगला दिवस असल्याचे सांगितले.
अँड.उपाध्याय म्हणाले कुडाळसाठी आजचा महत्वाचा दिवस आहे.कुडाळ हे पर्यटन जिल्ह्यातील केंद्र बिंदू आहे.कुडाळ येथील न्यायालयाच्या इमारतीला शंभर वर्षं पूर्ण झालेली होती, आता नवीन इमारत होत आहे. नवीन इमारत अद्ययावत करण्यात येणार आहे.
ऍड नितीन बोरकर म्हणाले की,खटले कोर्टात येवू नये असं आम्हाला वाटतं पण खटले काही कमी होत नाही.खटले हे न संपणारे आहेत, न्यायालयाला अगोदर खरं काय आहे हे पाहावे लागत होते पण आता खोटं कमी कोण बोलतो? हे पाहावे लागत असल्याचे सांगितले.
अँड संग्राम देसाई म्हणाले की, न्यायालय तयार होण्यापूर्वीच कुडाळवासिय मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत त्यांचे मी धन्यवाद मानतो.सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले टॅलेंट आहे,त्यांची न्यायाधिश होण्याची क्षमता आहे,आमचं त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने एक स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे,या स्पर्धेत तरुण वकील मंडळींनी सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन एड.देसाई यांनी केले.सिंधुदुर्गात वकील आणि ज्युडीशरी चांगले काम करत आहे.आपल्या भागात टॅलेंट खुप आहे पण ते वरच्या न्यायालयात पोचत नाही, त्यासाठी कोल्हापूर खंडपीठ होणे काळाची गरज आहे असे सांगून नवोदित वकिलांनी मोठी स्वप्ने पहावीत व यश मिळवावे असे आवाहन केले.यावेळी
मुंबई उच्च न्यायालय येथे रजिस्टार म्हणून कार्यरत असलेले आर.एन.जोशी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन सुपुत्र न्यायाधीश बनून उच्च पदावर कार्यरत आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयात रजिस्टार म्हणून कार्यरत असलेले लाडशेठ उर्फ राकेश बिले आणि नागपूर येथे रजिस्टार म्हणून कार्यरत असलेले श्री.सातावळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळीनूतन वास्तुचे ध्वनी चित्रफीत दाखविण्यात आले.न्यायमूर्ती भुषण गवई यांचेसह उपस्थित सर्व मान्यवरांना सोनचाफा व सर्वोच्च न्यायालयाची प्रतिकृती देवुन स्वागत करण्यात आलेआभार राजश्री नाईक यांनी मानले.
कुडाळ तहसीलदार नजिकच्या जागेत कनिष्ठ स्तर न्यायालयात कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी देवेंद्रकुमार नितीन बोरकर, पारिजात पांडे,खा.विनायक राऊत, हेमंत गायकवाड अश्विनी बाचुळकर,ऍड संग्राम देसाईसह मान्यवर उपस्थित होते.