
मालवण : आमदार वैभव नाईक हे व्यवसायिकांना, अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या घटकांना फोन करून कारखाने बंद करून टाकेन अशी धमकी देत आहेत. जो सहकार्य करणार नाही त्याला संपून टाकायच्या धमक्या दिल्या जात आहे. २० तारीख पर्यंत हे सहन करा असे ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.
निलेश राणे एक्स अकाउंट वर पोस्ट करत म्हणाले आहेत, मी तमाम कुडाळ मालवण वासियांना हात जोडून विनंती करतो, मला खात्री आहे आमदार नाईकांनी आपल्याला फोन करून त्रास द्यायला सुरु केला आहे पण आपण फक्त २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सहन करा, नंतर कधीच आपल्या कसलाही त्रास मी होऊ देणार नाही. व्यवसायिकांना, अधिकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या घटकांना फोन करून मला भेटून जा नाहीतर मी बघून घेईन हे सध्या उपक्रम नाईक यांचे सुरु आहे. कारखाने बंद करून टाकेन अशी धमकी दिली जात आहे, जो सहकार्य करणार नाही त्याला संपून टाकायच्या धमक्या दिल्या जात आहेत. म्हणून मी अगोदर म्हणालो फक्त २० तारखे पर्यंत सहन करा असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.