कनिष्ठ महाविद्यालय सांगेलीचा निकाल १०० टक्के

Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2024 13:01 PM
views 158  views

सावंतवाडी : माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली  महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून परिक्षेला एकूण १०२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. कला शाखेतून अक्षता ७०.८० टक्के, द्वितीय शुभम पवार ५७.३३ टक्के, कनिषा चव्हाण हिने ५४.१७ टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेतून खुशी राऊळ ७६.६७ टक्के,  द्वितीय मंजुषा राऊळ ६८.१७ टक्के तर तृतीय विद्या राऊळ ६७.५० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तर विज्ञान शाखेतून प्रतीक्षा गावडे ७७.५० टक्के प्रथम,  देवांक सावंत ७३.६७ टक्के द्वितीय तर इशा सांगेलकर ७३.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. त्यापैकी २ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ६३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ३६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर उर्वरीत एका विद्यार्थ्यांने तृतीय श्रेणी प्राम केली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पंढरीनाथ राऊळ  सचिव श्री विश्वनाथ रामचंद्र राज्य, प्राचार्य श्री रामचंद्र घावरे आणि सर्व संस्था प्रदाधिकारी सर्व शाळा समिती सदस्य सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.