विशाल परब यांच्या वाढदिनी जुबिन नौटियाल सावंतवाडीत !

पहिल्यांदाच महाराष्ट्र व गोव्यात लाईव्ह शो
Edited by: विनायक गावस
Published on: October 07, 2023 19:29 PM
views 788  views

सावंतवाडी : भाजप युवा नेते, उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि गोव्यात जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शो सावंतवाडीत होत आहे. विशाल परब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त 15 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 5.00 वाजता सावंतवाडी जिमखाना मैदान येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ज्युबिन नौटियालच्या चाहत्यांना खास बॅण्ड दिला जाणार असून विशाल परब यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहून ज्युबिन नौटियालच्या लाईव्ह कॉन्सर्टचा लाभ घ्यावा अस आवाहन भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केल आहे‌.

भाजप युवा नेते उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता सावंतवाडी जिमखाना मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केक कापून विशाल परब यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर खास संगीत रसिकांसाठी ज्युबिन नौटियाल याचा खास लाईव्ह शो आयोजित करण्यात आला आहे.

जिमखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या जुबिन नौटियाल यांच्या लाईव्ह गाण्यांच्या कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक चाहत्यांसाठी खास प्रत्येक तालुक्यात बुथ कमिटी नेमण्यात आली आहे. त्या ठिकाणी तो फॉर्म भरून शोच्या  प्रवेशसाठी बँड देण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांना बुथ च्या ठिकाणी प्रवेश फॉर्म भरावा, एक व्यक्ती कुटुंबातील सदस्यांचा फॉर्म भरून बॅण्ड घेऊ शकते‌. या ज्युबिन नौटियालच्या लाईव्ह शोचा लाभ घ्यावा असे आवाहन अजय गोंदावळे यांनी केले आहे. 

यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, शहर सरचिटणीस विनोद सावंत, किसान मोर्चा शहराध्यक्ष हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.