मुंबई - गोवा हायवेच्या दुरवस्थेबाबत देवगडमधील पत्रकारांनी वेधलं लक्ष

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 10, 2023 15:16 PM
views 302  views

देवगड : देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांसंदर्भात आणि तब्बल १२ वर्षे रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा निषेध करण्यासाठी व रायगड मधील पत्रकारांच्या बोंबाबोंब आंदोलनाला पाठींबा देत निवेदन देण्यात आले.

यावेळी देवगड तालुका पत्रकार समिती अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सचिव सचिन लळीत, पत्रकार राजेंद्र मुंबरकर,हेमंत कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, प्रशांत वाडेकर, सुरज कोंयडें, स्वप्निल लोके, विश्वास मुणगेकर, राजेंद्र साटम विष्णू धावडे आदी उपस्थित होते.

या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, कोकणातील सर्वांगीन विकासासाठी रखडलेल्या या मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने कोकण वासीयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नी प्राधानान्ये लक्ष देऊन एक तप रखडलेल्या महामार्गांच काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आम्ही देवगड तालुका पत्रकार समिती हे निवेदन देऊन रायगडमधील पत्रकारांच्या आंदोलनाला सुध्दा आपण जाहीर पांठीबा देत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे.