
सावंतवाडी : येथील तालुका पत्रकार संघ व सिंधुदुर्ग प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्कार छायाचित्रकार गणेश उर्फ बाळा हरमलकर यांना यांना जाहीर करण्यात आला. तर तालुका पत्रकार संघाचे इतर पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदनही करण्यात आले.
कार्यक्रमास तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, मसुदा समितीचे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे, पत्रकार अमोल टेंबकर, प्रेस क्लबचे अनंत जाधव, पत्रकार संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, रामचंद्र कुडाळकर, मोहन जाधव, सचिन रेडकर, प्रा. रुपेश पाटील, विनायक गांवस, दीपक गावकर, लुमा जाधव, विजय देसाई, रुपेश हिराप, हेमंत खानोलकर, संदेश पाटील, विश्वनाथ नाईक, सिद्धेश सावंत, नरेंद्र देशपांडे, शुभम धुरी, अनुजा कुडतरकर, भुवन नाईक आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.