पत्रकार शैलेश मयेकर यांच्या घराची भिंत कोसळली

Edited by: विनायक गावस
Published on: July 27, 2023 14:10 PM
views 347  views

सावंतवाडी : तालुक्यात पावसाचे थैमान सुरू असून पडझडीच्या घटना घडत आहेत. पत्रकार शैलेश मयेकर यांच्या सावंतवाडी खासकीलवाडा गोठण येथील घराची भिंत कोसळली आहे. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच ही भिंत लगतच असलेल्या संरक्षक भिंतीवर कोसळल्यामुळे संरक्षक भिंत देखील तुटून पडली आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.