
सावंतवाडी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी इथं दोन कक्षात ५२ निवडणुक निर्णय अधिकारी अर्ज स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडीतून लढाणार असल्याच जाहीर केली. तर युती नको म्हणून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत कुस्ती सुरू असतानाच आज भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना संयुक्त पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होणार का ? याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे.
युती नको अशी कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, वरिष्ठ नेते युतीसाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे या संयुक्त पत्रकार परिषदेत नेमकं काय घडतंय याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे.