
कुडाळ : स्टेट बँक व्यापारी संघ कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक शुक्रवारी एसबीआयच्या कुडाळ शाखेमध्ये झाली. यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बँकेकडून न मिळणारे सुट्टे पैसे, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून मिळणारी उद्धट वागणूक, ग्राहकाशी सुसंवाद नसणे यासह अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी येत्या एक-दोन महिन्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्यांची पूर्तता बँकेच्या तर्फे केली जाईल असे अश्वासन एसबीआयच्या रत्नागिरी प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकारी श्रीम. ग्रेस यांनी दिली. या बैठकीला द्वारकानाथ घुर्ये, राजन नाईक, नितीन वाळके, संजय भोगटे, अवधूत शिरसाट, पी.डी.शिरसाट, राजेश राजाध्यक्ष, अशोक करंबेळकर स्टेट बँकचे कणकवली, कुडाळ, सावंतवाडी शाखाधिकारी उपस्थित होते.