'उबाठा'ला गळती, भाजपात भरती !

'मविआ'ची गाव टार्गेट करा, प्रवेशाचे कार्यक्रम करा : मंत्री नितेश राणे
Edited by:
Published on: February 22, 2025 12:40 PM
views 183  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व बैठकीच्या निमित्ताने उपस्थित पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पालकमंत्री भाजपचा आहे, पहिलं प्राधान्य भाजपला. जे महायुतीचे सरपंच नाही त्यांना निधी नाही. मला कोण विचारणारही नाही. पक्ष वाढवायचा अधिकार आम्हाला आहे.नविन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेउन बसणार आहे. उबाठाला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे. भाजपचे खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान आहेत हे कुणीही विसरू नये असं विधान यावेळी राणेंनी केलं. उबाठा व महाविकास आघाडीच गाव टार्गेट करा, गाडीत बसवून भाजपात प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, तुमची सत्ता आलेली आहे‌. समित्या, पदांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. संधीच सोन करा असं आवाहन केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्यावर अन्याय झाला आहे. महाविकास आघाडीच्या काळात सगळे अनुभव आम्ही घेतले. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देण्याच काम केलं आहे. आमच्या लोकांना जेलमध्ये टाकल गेलं. आता कर्जाची परतफेड व्याजासह करणार आहोत अस मत व्यक्त केले. पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी मतदारसंघात उबाठा शिवसेनेला मोठे खिंडार पाडले असून ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

यात इन्सुली येथील उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन पालव, उबाठाचे पागावाडी वॉर्ड प्रमुख संतोष मांजरेकर, उबाठा गटाचे निगुडे गावचे माजी सरपंच समीर गावडे यांनीही भाजपात प्रवेश केला. शेर्ले पानोसेवाडी येथील अनिल राऊळ, विलास राऊळ, अरुण राऊळ, महादेव राऊळ, सुरेश राऊळ, मनोहर राऊळ, विजय राऊळ, अर्चना राऊळ, लता राऊळ, दिपिका राऊळ, अनिल राऊळ, सुहासिनी राऊळ, दर्शना राऊळ, देविदास राऊळ, शरद राऊळ, सुनिता राऊळ, प्रभाकर राऊळ, दीपक नाईक, प्रकाश राऊळ, जगदीश राऊळ आदींनी प्रवेश केला.दांडेली येथील विठू शेळके, लक्ष्मण शेळके, केदू शेळके, धाकू खरात, धाकू शेळके, राहूल खरात, साखराबाई शेळके, शशीकला शेळके, मंगल शेळके, विजय शेळके, मनोज खरात, समीर शेळके यांनी भाजपात प्रवेश केला.दोडामार्गमधील तळेखोल, पिकुळेतील उबाठा शिवसेना, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, जान्हवी खानोलकर आदींसह शेकडो पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.शेर्ले शेटकरवाडी येथील 

ग्रा.प सदस्या एकता शेर्लेकर, एकनाथ शेर्लेकर,शोभना शेर्लेकर,प्रियांका धुरी,उत्कर्षा केरकर, विशाका केरकर,स्मिता शेर्लेकर, सविता धुरी,रमेश शेर्लेकर, सुनिल तेली,महेश तळगावकर,हार्दीक तळगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर आरोस दांडेली धनगरवाडी येथील केदु शेळके,साखराबाई शेळके,कांता शेळके,रामा शेळके,लक्ष्मण शेळके,बबन शेळके,बबन शेळके,विजय शेळके,कांचन शेळके,गीता शेळके,शकुंतला शेळके,रेश्मा शेळके,सविता शेळके,लवू शेळके,अंकूश शेळके,आकाश शेळके,शशिकला शेळके,धोंडू शेळके,जनाबाई शेळके,विठू शेळके,प्रतिभा शेळके,सचिन शेळके,मनिषा शेळके,पुजा शेळके,तेजल शेळके, काजल शेळके,सगी शेळके,धाकू शळके,ललिता शेळके,समिर शेळके,सिध्देश शेळके,सान्वी शेळके,समृद्धी शेळके,बाबुराव खरात,सुवर्णा खरात,राहूल खरात,ऋतुजा खरात,रोहीणी खरात,गंगाबाई खरात,मनोज खरात,मनाली खरात,प्रकाश खरात,प्रतिक्षा खरात,प्रज्योत खरात,प्रियांका खरात,धाकु खरात,सविता खरात,सविता खरात,प्रसाद खरात,प्रथमेश खरात,विठ्ठल वरक,भागीरथी वरक,मयुरी वरक यांनी भाजपात प्रवेश केला.