
राजापूर : राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधूरत्न समृद्ध समितीचे सदस्य, शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय ओगले आणि राजापूर अर्बन बँकेचे संचालक विवेक गादिकर यांच्या सह अनेक नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
जिल्ह्यात विकास कामांचा धडाका ज्या पद्धतीने सुरू आहे. त्याच पद्धतीने राजापूर शहरात आणि तालुक्यात भरीव अशी विकासाची कामे झाली पाहिजेत. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातूनच तालुक्याचा आणि शहराचा विकास होऊ शकतो. त्यामुळेच आम्ही सगळ्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती संजय ओगले यांनी दिली. या पक्ष प्रवेशामध्ये संजय दुधवडकर, राजू धुळप, विनायक सावंत, गनी याहू, प्रसन्न मालपेकर, प्रकाश पाटील आदींनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनीफ मुसा काझी, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे.