
वैभववाडी : तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील लोरे नं २गावचे सरपंच, उपसरपंच व कोळपे, कुर्ली येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर उबाठाला सुरू झालेली गळती अद्याप संपलेली नाही. आज लोरे नं २गावचे सरपंच विलास नावळे, उपसरपंच शुभांगी कुडतरकर यासह गावातील शेकडो ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. तसेच कोळपे ग्रामपंचायतीचे सदस्यांमध्ये दिलीप कांबळे, शुभांगी कांबळे, रजिया सरदार ठाणगे,उपसरपंच शुभांगी कुडतरकर, सोसायटी संचालक सुभाष कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य संगीता कदम, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा शिवगण, युवासेना उपतालुकाप्रमुख गुरुराज डोंगरे, युवा सेना शाखाप्रमुख प्रतीक मोरे, बूथ प्रमुख महेंद्र राणम, माजी शाखाप्रमुख दिलीप मांजलकर, युवा सेना शाखाप्रमुख चंद्रकांत नावळे, संचालक किशोर धावरे, संचालक विनोद परवडे, संचालक प्रकाश गोरुले, कुर्ली ग्रामपंचायत सदस्य योगेश कदम यांच्यासह गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.उबाठाला लोरे जिल्हा परिषद मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.