
वैभववाडी : भुईबावडा पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून जिओ कंपनीची सेवा विस्कळित झाली आहे. त्यामुळे अनेक मोबाईल ग्राहकांची गैरसोय होत आहे.
भुईबावडा येथे जिओ कंपनीचा मनोरा आहे.त्यात गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाला आहे. यावरुन सुरू असलेली नेट सुविधा विस्कळित झाली आहे. याचा फटका या भागातील ग्राहकांना बसला आहे. इंटरनेवरुन होणारी कामे ठप्प झाली आहेत. संबधित यंत्रणेने तात्काळ दुरुस्ती करून सेवा सुरळीत करावी अशी मागणी पंचक्रोशीत ग्राहकांकडून होत आहे.