वैभववाडीत जिओची सेवा विस्कळित ; ग्राहकांना मनस्ताप

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 29, 2023 18:29 PM
views 78  views

वैभववाडी: तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून शहरातील जिओ कंपनीची सेवा कोलमडली आहे.इंटरनेट सेवेसह काॅलींग सेवा विस्कळित झाल्याने अनेकांचे हाल झाले आहेत.

      शहरात गेल्या चार दिवसांपासून जिओ सेवेचा बोजवारा उडाला आहे.काॅलींगवेळी ग्राहकांना आवाज ऐकू येत नाही.तसेच इंटरनेट सेवाही विस्कळित झाली आहे.केवळ शहरातच ही समस्या आहे.उर्वरीत भागातील सेवा सुरळीत सुरू आहे.शहरात मोठ्या प्रमाणावर या कंपनीचे ग्राहक आहेत.त्यांना या विस्कळित झालेल्या सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.