शिरोड्यात प्राची नाईक यांचा झंझावाती प्रचार

गावच्या विकासाचे व्हिजन समोर : नाईक
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 16, 2022 19:37 PM
views 298  views

वेंगुर्ला : शिरोडा ग्रामपंचायत निवडणूकित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्राची प्रकाश नाईक या सरपंच पदाच्या निवडणुकीत रिंगणात असून त्यांचा झंझावाती प्रचार लक्षवेधी ठरला आहे. यामुळे गावच्या विकासाचे व्हिजन घेऊन या निवडणुकीत आपण उतरले असून शिरोड्यातील जनतेने आपले आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन प्राची नाईक यांनी केले आहे.