
देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड - गावठण येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक श्रीमती जयवंती अनंत राणे ( ८७ ) यांचे बुधवारी दि. १८ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे सकाळी ७.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई वांद्रे पूर्व येथील महात्मा गांधी विद्यामंदिर चे शिक्षक सुधीर राणे यांच्या त्या मातोश्री तर मुंबई वांद्रे पश्चिम येथील भाभा हॉस्पिटल च्या परिचारिका सौ. साक्षी राणे यांच्या त्या सासू होत. तसेच माजी सरपंच सौ. संचिता संतोष भोगले यांच्या त्या मोठ्या आत्या होत. तर प्रख्यात भजनी बुवा विशाल राणे व चाफेड चे उपसरपंच महेश राणे , शिवसेना शाखाप्रमुख उदय राणे यांच्या त्या काकी होत. त्या अतिशय मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने चाफेड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.