
खेड : खेेड तालुक्यातील शेल्डी खालची वाडी येथील जयेश रामचंद्र आंब्रे ( वय ३० वर्षे ) हा मुंबई वरून गावी आला होता. तो नोकरी निमित्त मुंबईत राहत होता. काल रविवार १५ जुलै रोजी, मित्रांबरोबर पोहण्यासाठी धरणा जवळ गेला होता. अतिवृष्टी मुळे धरणाच्या शेजारी असलेल्या नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.
त्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. सकाळ पासून धरण परिसरात आणि नदीपात्रात शोध सुरू होता. दुपारी १२ वाजता त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील, आणि भाऊ असा परिवार आहे.