वैभववाडीत गोकुळ दूध संघाच्या संकलन केंद्राचा जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 01, 2023 19:45 PM
views 144  views

वैभववाडी : गोकुळ दूध संघाच्या माऊली दुध उत्पादक संघ मर्या.वैभववाडी या संकलन केंद्राचा  वैभववाडी तालुका आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते  आज शुभारंभ झाला.शहरात गोकळचे दुध संकलन केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.          

शहरासहीत आजुबाजुच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी गोकुळने शहरात दुध संकलन केंद्र सुरू केले आहे.याचा शुभारंभ बुधवारी सकाळी झाला.या प्रसंगी बोलताना श्री रावराणे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी गोकुळने हे चांगले काम केले आहे.शेतीपुरक दुग्ध व्यवसायाला गोकळकडून साथ मिळत आहेत.शेतक-यांना या व्यवसायातून आर्थिक उन्नती करावी.विविध योजनांचा लाभ घेऊन तालुक्यातून जास्तीत जास्त दुध उत्पादन होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन श्री रावराणे यांनी केले.

दुध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन चेअरमन राजेश पडवळ यांनी दिले.वैभववाडी तालुक्यात सहकार रुजण्यासह अधिक वृद्धींगत होताना येथील शेतकऱ्यांच्या हाताला दाम मिळवून देण्याच्या उद्देशाने गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून वैभववाडी शहरात माऊली दुध उत्पादक सहकारी  संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळसीदास रावराणे काढले.यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.यावेळी उत्पादक सभासदांना गोकुळ दूध महासंघाबद्दल अनिल सिकरे व राजेश गावकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी वैभववाडी तालुका आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळसीदास रावराणे,गोकुळ दूध महासंघाचे अनिल सिकरे व राजेश गावकर, माऊली दुध उत्पादक संघ चेअरमन राजेश पडवळ, व्हा.चेअरमन सदानंद माईणकर, सचिव मंदार चोरगे. दुध उत्पादक शेतकरी नारायण मांजरेकर,चंद्रकांत अम्रसकर, पंडित रावराणे, सुरेंद्र रावराणे, संदिप पांचाळ, परेश सावंत, सदानंद सुतार, संतोष रावराणे,  अक्षय गुरव, शुभम माळकर, राघोबा नारकर, राजेश सरवणकर, प्रथमेश पडवळ आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.