
वैभववाडी: कोल्हापूर जिल्ह्यातील पासर्डे गावचे सरपंच विष्णू पाटील व दोनवडे गावचे सरपंच बबन पाटील यांचा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी सत्कार केला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वैभववाडी तालुक्याचा जुना मतदारसंघ असलेल्या पन्हाळा विधानसभा मतदारसंघात वैभववाडीचे जयेंद्र रावराणे यांनी नुकताच दौरा केला होता. या दरम्यान नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार केला. यामध्ये पासर्डेचे विष्णू पाटील व दोनवडेचे सरपंच बबन पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी कोल्हापूरचे माजी जि.प.अध्यक्ष पुंडलिक पाटील उपस्थित होते. श्री. रावराणे यांनी दोन्ही नवनिर्वाचित सरपंचांना समाजकारणाचा कानमंत्र दिला. लोकहिताची कामे प्राधान्याने करावित, असा सल्ला दिला.