पार्सलमधून आल्या चिंध्या | जामसंडेतील महिलेला ऑनलाईन गंडा..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 16, 2023 11:22 AM
views 308  views

देवगड : ऑनलाईन ड्रेस मागविताना जामसंडे येथील महिलेची फसवणूक झल्याची बाबा समोर आली आहे. फॉल लावलेली साडी व चिंध्या पार्सल मधून आल्या. जामसंडे विष्णुनगर येथील महिलेची रु ३२,१३५/- रूपये अज्ञात व्यक्तिने ऑनलाईन ट्रांजेक्शन करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.


हा प्रकार शनिवार दि. १५ जुलै राेजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत झाला. याप्रकरणी त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी अज्ञात व्यक्तिविराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जामसंडे विष्णुनगर येथील एका महिलेने यांनी दि ४ जुलै राेजी ड्रेस डॉट इन या फेसबुक साईट वरून ऑनलाईन ड्रेस मागविला हाेता. मात्र, १२ जुलै राेजी आलेल्या पार्सलमध्ये ड्रेस ऐवजी फॉल लावलेली साडी व चिंध्या आल्या.

त्यांना पसंत नसल्याने ते पार्सल परत पाठविले व कॅश ऑन डिलीव्हरीनुसार दिलेले ७९९/- रूपये परत करण्यासाठी एस्एम्एस् केला यावेळी त्यांना फॉर्म भरण्यास सांगीतले.फॉर्म भरल्यानंतर व पैसे रिंफंड करण्यासाठी एस्एम्एस् केल्यानंतर त्यांनी शनिवारी पैसे रिंफंड झाले का याबाबत चेक केले असता पैसे रिंफंड न हाेता रु ३२,१३५/-रूपये रक्कम अज्ञात व्यक्तिने ऑनलाईन ट्रांजेक्शन करून करून काढून घेतले व फसवणुक केल्याचे त्यांचा निदर्शनास आले.

त्यांनी याबाबत देवगड पाेलिस स्थानकात तक्रार दिली असून पाेलिसांनी अज्ञात व्यक्तिविराेधात भादवि 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यत आला आहे.