
सिंधुदुर्गनगरी : कृषीभूषण आबासाहेब ऊर्फ रमाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेगुर्ला येथे न्यू एज कोर्स अंतर्गत नावीन्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रीकल) ४० जागांचा २०२५ प्रवेश सत्रात समावेश करण्यात आला आहे. या जागांसाठी शैक्षणिक पात्रता इ. १० वी उत्तीर्ण असून कालावधी एक वर्ष आहे. तरी इच्छुक मुला-मुलीनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क करण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
सध्याच्या काळात पर्यावरणाची स्थिती आणि नैसर्गिक साधन सामग्रीचा होत असलेला वारेमाप उपयोग यांचा विचार करता नैसर्गिक उर्जास्त्रोतांचा वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे, अशा काळामध्ये सौर उर्जेचा वापर पूर्ण जगामध्ये तसेच भारतामध्ये प्रचंड वाढलेला असून यामध्ये रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संथी प्रचंड प्रमाणावर उपलब्ध आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवनवीन टेक्नोलॉजीचा वापर करून त्यानुसार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातात याचाच एक भाग म्हणून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तथा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिलेल्या मान्यतेनुसार २०२५ वर्षापासून या संस्थेमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रीकल) या व्यवसायासाचा समावेश करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून संस्थेत निश्चित करावे, संस्थेमध्ये कार्यालयात प्रवेशासंदर्भात सर्व माहिती दिली जाते.