
देवगड : देवगड तालुक्यातील शिवज्योती कॉम्प्लेक्स कॉलेज रोड येथे राहणाऱ्या सुप्रिया अविनाश गुंजाटे यांचा देवगड - तुळजापूर या गाडीतून दागिन्यांसह एकूण 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी देवगड पोलीस ठाण्तयात दिली.
9 जानेवारीला त्या सकाळी 11.30 वा.च्या दरम्याने कवठेगुंलद कुमेमळा,ता शिरोळ, जि. कोल्हापुर येथुन निघाल्या. यावेळी त्यांनी सोन्याचे दागिने ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवुन हा बॉक्स जांभळ्या रंगाच्या प्रवासाच्या बॅगेमध्ये ठेवला. त्यानंतर भाच्यासोबत मोटार सायकलने सांगली बस स्टॅण्ड येथून देवगड येथे येण्यासाठी निघाले. त्यानंतर त्या, सासु व मुलगा असे दुपारी 01.00 तुळजापुर ते देवगड या बसने देवगड येथे येण्यासाठी निघाले. या बसमध्ये जांभळ्या रंगाच्या प्रवासाची बॅग त्या उभ्या असलेल्या ठिकाणापासुन दोन सीटच्या पुढे ठेवलेली होती. त्यानंतर सदर बसमध्ये जास्त गर्दी असुनही बॅगकडे लक्ष ठेवुन होते. त्यानंतर सदर बस कोल्हापुर बस स्टॅण्ड येथे आल्यावर बसमधील गर्दी कमी असल्याने या बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळाल्याने जांभळ्या रंगाच्या प्रवासी बॅग त्यांनी आपल्या जवळ घेवुन बसले. त्यावेळी ती बॅग बंद स्थितीत व्यवस्थित होती. ही बस गगनबावडा बस स्टॅण्ड येथे 10 मिनिट करिता थांबली. त्यावेळी त्या आणि सासु असे फ्रेश होण्यासाठी बसमधुन खाली उतरल्या. त्यावेळी त्यांच्या सोबतची जांभळ्या रंगाच्या प्रवासी बॅग गाडीच्या सीट खाली ठेवुन गेलेले होते. त्यानंतर फ्रेश होवुन परत गाडीत आल्यावर ही बॅग सीटच्या खाली आहे त्या स्थितीत होती. त्यानंतर असा प्रवास करुन गाडी देवगड बस स्टॅण्ड येथे रात्रौ 08.15 वा. च्या दरम्याने आल्या.
दुसऱ्या दिवशी त्यांनी बग उघडून पाहिली असता त्यांना त्यात दागिने दिसून आले नाहीत. अशा प्रकारे 3 लाख 80 हजारांचे दागिने गायब झाल्याची माहिती त्यांनी पोलीसांना दिली. या पुढील तपास देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करत आहेत.