'ते' शीतयुद्ध खुर्चीसाठी नाही तर जमिनींसाठी : वैभव नाईक

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 16, 2024 08:23 AM
views 186  views

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये सध्या शीतयुद्ध सुरू असल्याबाबत आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले या दोघांमध्ये असलेले शीतयुद्ध हे सत्तेच्या खुर्चीसाठी नाही, तर जमिनिंसाठी आहे. जिल्ह्यातील जनतेच्या आता हे लक्षात आले आहे, की या दोघांमध्ये असलेले शीत युद्ध हे केवळ जमिनीसाठीच असल्याचा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला.