मुलांवर शालेय अवस्थेत स्वच्छतेचे संस्कार करणे गरजेचे : विनायक ठाकूर

Edited by: विनायक गावस
Published on: October 17, 2023 13:46 PM
views 68  views

ओरोस : शालेय मुले हि आरोग्यदायी भारताचा कणा आहे. त्यामुळे या मुलांवर शालेय अवस्थेत स्वच्छतेचे संस्कार करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन  (पाणी व स्वच्छता) उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने जागतिक हात धुवा दिनांचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय जागतिक हात धुवा दिन कार्यक्रमांचे आयोजन केंद्र शाळा क्रमांक 1, ग्रामपंचायत उभादांडा, वेंगुर्ला येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उभादांडा सरपंच निलेश चमणकर गट  विकास अधिकारी वेंगुर्ला पंचायत समिती पुनम राणे, गट शिक्षण अधिकारी संतोष गोसावी, केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर, मुख्याध्यापक गणेश चव्हाण, डॉ.सई लिंगवत, संदिप परुळेकर, अण्णा रेडकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. विनायक ठाकुर म्हणाले की,  हात स्वच्छ न धुतल्याने विविध आजाराना सामोरे जावे लागते. त्यामुळे आरोग्याबरोवर आर्थिक तोटा हि सहन करावा लागतो. शालेय मुले हि आरोग्यदारी भारताची संपत्ती आहे. त्याच्यावर या वयात स्वच्छतेचे संस्कार करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन शालेय मुलांसाठी विविध स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत नियोजन करावे अशा सुचना हि त्यानी यावेळी दिल्या.  यावेळी शालेय मुलांनी स्वच्छता शपथ घेतली. तर डॉ. सई लिंगवत यानी मुलांना हात धुण्याबाबवचे फायदे व प्रात्याक्षिक करुन दाखविले.