देवगडमध्ये हक्काचे नाट्यगृह उभे करण्याची जबाबदारी माझी : नितेश राणे

Edited by:
Published on: May 19, 2025 19:49 PM
views 47  views

देवगड : देवगड मध्ये हक्काचे नाट्यगृह उभे करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे माझी असेल, देवगडला कलेचा वारसा लाभलेला आहे आणि हे पुढच्या पिढीला कळावं म्हणून देवगडात नाट्यगृह असणे ही काळाची गरज असून येणाऱ्या काही वर्षांमध्ये देवगडमध्ये हक्काचं नाट्यगृह असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. युथ फोरम देवगड आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित नाट्य महोत्सव २०२५ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, देवगड मध्ये हक्काचे नाट्यगृह उभे करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे माझी असेल आणि ती मी पूर्ण करीन असा विश्वास देखील राणे यांनी व्यक्त करत. कोकण सन्मान ,नाट्य महोत्सव असे विविध कार्यक्रम होत जावे हे आपले स्वप्न आहे व देवगडचे नाव हे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक क्षेत्र मनोरंजनातून नेहमीच चर्चेत राहिले पाहिजे ते या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून अधोरेखित होत आहे.

झी सिनेमा अवॉर्ड असे कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणणे हा माझा स्वार्थ आहे. झी सिनेमा अवॉर्ड च्या माध्यमातून लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. हे निश्चित कळेल झी सिनेमा अवॉर्ड च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन समजेल तेव्हा गोव्याकडे असणारे पर्यटक निश्चित सिंधुदुर्गकडे वळतील आणि रोजगार व विकासाची दालने उघडी होतील असा विश्वास देखील पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नाट्यप्रयोग झी सिने अवॉर्ड असे विविध उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवल्याने सिंधुदुर्गाचे नाव हे जगाच्या नकाशामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नेहमीच अग्रेसर राहिले पाहिजे हा आमचा प्रयत्न असून तो निश्चित आम्ही पूर्ण करू असा विश्वास देखील यावेळी राणे यांनी व्यक्त केला.कलाप्रेमी कै संजय भालचंद्र धुरी यांच्या स्मरणार्थ नाट्य गौरव पुरस्कार २०२५ विद्याधर कार्लेकर यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी  व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे तालुका अध्यक्ष राजेंद्र भुजबळ. बंड्या नारकर जिल्हा बँक माजी संचालक ऍड अविनाश माणगावकर,कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम, नगरसेवक संतोष तारी, संतोष किंजवडेकर,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,युवा मोर्चा शहर .अध्यक्ष दयानंद पाटील युथ फोरम अध्यक्ष सिद्धेश मांणगावकर प्रणव नलावडे,आकाशसकपाळ,ऋत्विक धुरी व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.