
देवगड : शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या साठी सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविने अनिवार्य असणार आहे.असे तहसीलदार देवगड यांच्या वतीने सूचना करण्यात आल्या आहेत. अँग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपला ७/१२ आधारला लिंक करावयाचा आहे.जेणेकरून शेतकऱ्यांना एक फार्मर आयडी मिळने सुलभ होईल.ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ याद्वारे शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो.जर शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी बनविला नाही तर त्यासंदर्भातील पुढील योजनेचा लाभ त्यांना घेता येणार नाही असे तहसील देवगड यांच्या कडून पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.त्यासाठी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत आधारकार्ड., आधार लिंक मोबाईल क्रमांक, सर्व ७/१२ व ८ अ उतारे, त्यासाठी जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला ७/१२ ला आधार लिंक करून घ्यावे व फार्मर आयडी बनवून घ्यावा. यासाठी गावच्या ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
कारण प्रधानमंत्री किसान योजनेच्या थेट लाभ हस्तांतरणासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे,तसेच अनेक शासकीय योजनांच्या लाभाकरिता फार्मर आयडी मिळवावा असे आवाहन देवगड तहसील कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.